दौंडमध्ये इंदीरानगर येथे आईशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाला आईच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळताच तिच्या प्रियकरावर कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. आरोपीचे नाव विशाल थोरात असून मृत प्रवीण पवार याच्या डोक्यात, तोंडावर ठिकठिकाणी कोयत्याने सपासप वार करून ठार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.