बुलढाण्यातील डोंगरशेवली गावाजवळील जंगल परिसरात दोन अस्वल आढळली आहेत. हे अस्वल श्री सोमनाथ महाराज मंदिरात देखील दिसून आले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वन विभागाकडे त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.












