नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून गेल्या सहा महिन्यांत ५ हजारांहून अधिक श्वानदंशाच्या घटना नोंदवल्या गेल्या. २००८ मधील १० हजारांची संख्या आता १ लाखांवर पोहोचली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार यांनी नसबंदीतील भ्रष्टाचार, महापालिकेची निष्क्रियता आणि कोर्ट आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. उच्च न्यायालयाने जबाबदार अधिकाऱ्यांची यादी मागवून कारवाईचा इशारा दिला आहे.