स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाईंदरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. 24 वर्षीय पोलीस शिपाई रितिक चव्हाण यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात रितिक भरती झाले होते. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तपास सुरू असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.












