बीड तालुक्यातील पोतरा गावात पूल पार करताना शेतकरी राजाभाऊ टिंगरे जोरदार प्रवाहात वाहून गेले. चार तासांच्या शोधानंतर ते जवळच्याच शेतातील गाळात अडकलेल्या अवस्थेत सापडले आणि त्यांचे प्राण वाचले. जोरदार पावसामुळे पूलावरून वाहणारे पाणी पार करण्याच्या धाडसाने हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.