हिंगोली जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने आलेल्या सकल मराठा बांधवांशी सामूहिक संवाद बैठक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. या संवाद बैठकीसाठी रात्री १०.३० च्या सुमारास जरांगे पाटलांचा ताफा हिंगोली शहरात पोहोचताच, जेशीपीच्या सहाय्याने हिंगोलीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आज सकाळी १० वाजता होणाऱ्या या संवाद बैठकीतून काय दिशा ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












