वसमत ते औंढा रोडवरील भेंडेगाव रेल्वे गेटजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून असंख्य खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक अपघातांमुळे मृत्यू व अपंगत्वाच्या घटना घडल्या आहेत. ग्रामपंचायत पांगरा बोखारेच्या सरपंच सौ. सीमा बोखारे यांनी रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली असून, दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.