छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा–चौफुली रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून शालेय बसपासून सर्व वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. साइडपट्ट्या खचल्याने आणि डांबर उखडल्याने अपघातांची शक्यता वाढली असून जनतेतून “अपघातानंतरच विभागाला जाग येणार का?” असा संताप व्यक्त केला जात आहे












