बुलढाण्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने उगीचच गारवा वाढवला असून, आज पहाटेपासून शहरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. थंड हवेमुळे नागरिकांना हिल स्टेशनचा फील येत असून, चिमुकल्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. हवामानातील या बदलाचा मानवी आरोग्य व पिकांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.












