गडचिरोलीतील रिक्त पदे भरण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना पहिली पोस्टिंग गडचिरोलीत देण्याचे संकेत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले असून, याबाबत लवकरच जीआर काढला जाणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच दक्षिण गडचिरोलीत रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग कामात अडथळा आणणाऱ्या वनअधिकाऱ्यांवर कारवाईचेही इशारे दिलेत.