महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरातील आंबेडकरनगर वस्तीत काल रात्री बिबट्याने घराच्या दारात बांधलेल्या दोन कुत्र्यांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कुत्र्यांमध्ये झटापट झाली असून त्यापैकी एक कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.












