पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पवनचक्कीच्या मुद्यावरून गोंधळ उडाला. शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता आनंद पाटील पवनचक्कीच्या कामाविषयी तक्रारी मांडत असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना अडवले. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद वाढू नये म्हणून पालकमंत्री सरनाईक यांनी बैठक घाईघाईत आटोपती घेतली.












