विक्रोळी पार्कसाईट वर्षानगर विभागातील जनकल्याण सोसायटीत मध्यरात्री डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने मिश्रा कुटुंबावर प्रचंड आपत्ती आली. या दुर्घटनेत शालू मिश्रा आणि सुरेशचंद्र मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्षानगर परिसरातील ही डोंगराळ वस्ती वारंवार धोकादायक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी मलबा काढण्यात आला असून आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत.