मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलीने इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 14 ऑगस्टला दुपारी आई-वडील घराबाहेर असताना ही घटना घडली. ती मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिकत होती आणि अकरावीची विद्यार्थिनी होती. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही; पोलीस तपास सुरु आहेत.












