नागपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 20 ऑगस्टपासून खासगी ट्रॅव्हल्स शहरात सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश करू शकणार नाहीत. प्रवाशांना इनर रिंग रोडवर उतरून मेट्रो, सिटी बस किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागणार आहे. पोलिसांनी ही उपाययोजना शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी केल्याचे स्पष्ट केले आहे.












