काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून १६ दिवसांची, तब्बल १३०० किलोमीटरची ‘व्होट अधिकार यात्रा’ सुरू केली आहे. मतदार यादीतील अनियमितता व मतदान हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत ही मोहीम उभी केली असून, २० पेक्षा अधिक जिल्ह्यांतून यात्रा पार पडणार आहे. १ सप्टेंबरला पटण्यातील गांधी मैदानात महासभेने तिचा समारोप होणार आहे.












