कराड तालुक्यातील कापिल व गोळेश्वर येथील कथित बोगस मतदानाच्या मुद्द्यावरुन कराडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरसुद्धा कारवाई व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला विविध पक्ष संघटना आणि ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे