मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस बरसतोय. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर कंधार तालुक्यातील कोटबाजार गावात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. या अपघातात गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर आणि सध्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या त्यांच्या पत्नी यांचा घराची भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.