पुणे शहरात ‘National Conference On Hahnemannian Homeopathy’ या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले असून परिषदेचे उद्घाटन भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देशभरातील नामांकित होमिओपॅथिक डॉक्टर, संशोधक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परिषदेत होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांवर, संशोधनाच्या नव्या संधींवर तसेच रुग्णांच्या उपचारामध्ये होमिओपॅथीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.