‘ठरलं तर मग’ या मालिकेतील पूर्णा आजी अर्थात विख्यात मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई असून पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी हिंदीपासून कारकिर्दीची सुरुवात करून मराठी चित्रपट, नाट्य व मालिकांमध्ये पाच दशकांपेक्षा अधिक काळ उत्कृष्ट अभिनय केला आहे; त्यांनी “मी सिंधुताई सपकाळ” या चित्रपटातही अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले.












