नवी मुंबईत तब्बल दहा वर्षांपूर्वी झालेला फ्लॅट घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची 1.47 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्यापाऱ्याने पैसे भरूनही फ्लॅट मिळाला नाही आणि तो तब्बल दशकभर न्यायाच्या प्रतीक्षेत होता. सदर प्रकरण आता प्रकाशात आल्यानंतर पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे नोंदवले असून या मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यातील आरोपींचा शोध सुरू आहे.