राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. तसेच राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर भाष्य करत महत्त्वाची माहिती दिली. सर्व संशयितांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, राज्य महिला आयोगाने एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.












