छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर ई-वाहनांना टोल न देता प्रवास करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. परिवहन विभागाची चाचपणी अंतिम टप्प्यात असून यात मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतूवरही ई-वाहनांचा प्रवास टोलमुक्त होणार आहे. ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग सध्या २.४५ रुपये प्रतिकिमी टोल आकारतो, मात्र ई-वाहनांसाठी ही शुल्कमाफी लागू होणार आहे.