मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD ने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शहरात अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे BMC ने आज दुपारी 12 वाजल्यापासून पुढील 48 तास सर्व शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांसाठी अंधेरी सबवे दोन्ही मार्गांसाठी बंद करण्यात आला असून, वाहतूक गोखले ब्रिजमार्गे चालवली जात आहे. तसेच वाकोला ब्रिज, हयात जंक्शन आणि खार सबवेवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मंद गती आहे.












