अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष सलीम घाणीवाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महसूलमंत्री बावनकुळे, खासदार अन्वय बोंडे आणि आमदार रवींद्र वानखडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. स्थानिक राजकारणात काँग्रेसची ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून हा मोठा धक्का मानला जातो.