मुंबईत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले. 40 व्या वर्षी अभिनयात पदार्पण करणाऱ्या पोतदार यांनी 300 हून अधिक चित्रपट आणि डझनभर मालिकांमध्ये काम केले. आक्रोश, परिंदा, रंगीला, मुन्नाभाई, थ्री इडियट्स यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहायक भूमिकांनाही वेगळी ओळख दिली. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.












