दारूच्या नशेत रिक्षा चालवणाऱ्या चालकाने साताऱ्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलला थांबवण्याच्या प्रयत्नात 200 मीटर फरफटत नेलं. भाग्यश्री जाधव या कॉन्स्टेबल जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी चालकाने अनेक गाड्यांना धडक दिली, नागरिकांनी त्याला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांनी अटक केली.












