रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली असून कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे. कुंभे गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून मातीचा ढिगारा आणि झाडे झुडपे रस्त्यावरती आली आहेत. दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चार दिवस मुसळधार पावसाचा फटका रायगडला बसल्यामुळे अशा घटना घडत आहेत.












