रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीची पाणीपातळी 5.50 मीटरवर जाऊन इशारा पातळी ओलांडली आहे. चिंचनाका, मच्छीमार्केट, बाजारपूल, जुना स्टँड आणि सांस्कृतिक केंद्र परिसरात दीड फुटांहून अधिक पाणी साचले आहे. प्रशासन अलर्ट मोडवर तयार आहे.












