मुंबईतील वडाळा चर्चजवळ मुसळधार पावसात, शाळेतून परतणाऱ्या आई-लेकाला बीईएसटी बसने धडक दिली. या हादरवणाऱ्या अपघातात ७ वर्षांचा अँथनी सेल्वराज व त्यांची आई लोयबाह सेल्वराज यांचा जागीच मृत्यू झाला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.