शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर GPS आणि ब्लॅक बॉक्स बसविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी मोताळा तालुका काँग्रेस आणि काँग्रेस किसान सेलच्या वतीने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत केले. मोर्चात शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, या मोर्चामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
बाईट – प्रवीण कदम,तालुकाध्यक्ष काँग्रेस मोताळा..