पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचे पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून उजनी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल 6 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे. सध्या उजनी धरण 104.80 टक्के भरले असून 119.80 TMC पाणीसाठा झाला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 123 TMC इतकी आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते.