पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हुंडाबळीची घटना समोर आली आहे. वाकड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी २६ वर्षीय दिव्या हर्षल सूर्यवंशी ही तरुणी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. दिव्याचे लग्न आयटी इंजिनिअर हर्षल सूर्यवंशीसोबत तीन वर्षांपूर्वी झाले होते.दिव्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की पती आणि सासरकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी व फर्निचर करण्यासाठी पैशांच्या मागण्या होत होत्या. सततच्या छळामुळे दिव्याने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला