राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली असून गडचिरोली जिल्ह्याला देखील पुराचा मोठा फटका बसला आहे.१८ ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला असून रात्रीच्या सुमारास नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकूणच तालुका मुख्यालयात असलेल्या पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्यात अतिवृष्टी निर्माण झाली आणि संपूर्ण तालुका मुख्यालय जलमय झाले आहे.