गाझियाबादमधील 26 वर्षीय महिलेनं पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्याच्या मागण्या, छळ आणि जबरदस्ती गर्भपाताचा गंभीर आरोप केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, पतीनं तिच्यावर सतत body shaming करून तिला नोरा फतेहीसारखं दिसण्याचा दबाव टाकला आणि जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने गर्भपात झाला.