अमेरिकेच्या माजी संयुक्त राष्ट्र राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, अमेरिका–भारत संबंध तणावाच्या टोकाला पोहोचले असून त्यांची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणं अवघड होईल.त्यांनी भारताला “महत्त्वाचा लोकशाही भागीदार” मानण्यावर जोर देत, गेल्या २५ वर्षांत उभारलेल्या संबंधांना धक्का बसल्यास ती एक मोठी धोरणात्मक आपत्ती ठरेल, असा इशारा दिला.












