टिटवाळा येथील फळेगाव परिसरातुन एक दुःखद बातमी समोर येत आहे. मनासा रिहॅबिलेशन सेंटर मध्ये एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. जिजाबाई मंचेकर असे मृत महिलेचे नाव असून NDRF च्या टीमने या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत पोहचवला. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महिलेचा मृत्यू स्मशानभूमीपर्यंत कसा न्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता.












