गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे 112 गावे संपर्कविहीन झाली असताना भामरागड तालुक्यातील आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर झाली. रस्ते बंद असल्याने गडचिरोली पोलिसांनी तत्परता दाखवत पवनहंस हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांची सुटका करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.












