पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशन हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदतकार्य सुरू केले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.