शिराळा तालुक्यातील पनूंबरे शाखा अंतर्गत 11 KV चरण गावठाण फिडर ही वीजवाहिनी वारणा नदीच्या पुरात गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. या लाईनचा कंडक्टर तुटल्यामुळे नाथवडे व मोहरे गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे महावितरणचे जनमित्र यांनी धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात पोहत जाऊन कटपॉइंटवरील जम्प सोडवले. त्यांच्या या प्रयत्नामुळे दोन्ही गावांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.