सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी 42 फुटांवर पोहोचून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले असून सांगलीच्या ईदगाह मैदान परिसरात सुद्धा पाणी आले आहे.