जालना जिल्ह्यातील बदनापुर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. जालना जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या पथकाने आणि बदनापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 23 लाख 58 हजार रुपयांचा गुटखा आणि तीन चारचाकी वाहने असा एकूण 80 लाख 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.