महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरणारी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अवघ्या काही तासात येवला तालुका पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे १ लाख ६८ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येवल्यातील रिलायन्स जिओ टॉवरजवळून महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.