बीडमध्ये महिला होमगार्डचा मृतदेह बॉक्समध्ये बांधून नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती, तिच्या घरच्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यातच नाल्यात मृतदेह सापडला, पोलीस तपासात तिची मैत्रीण वृंदावनी हिने वैयक्तिक वादातून हत्या केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे बीड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले.