शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेंसेक्स ५०० अंकांनी घसरून ८१,५०० वर, तर निफ्टी ०.६% नी घसरून २४,९३२ वर बंद झाला. US फेड प्रमुख जेरॉम पॉवेल यांच्या भाषणाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. IT आणि वित्तीय शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने तेजीला ब्रेक लागला.












