जुन्या मुंबई पुणे महामार्गावर नढाल चौक येथील कालांबा माता मंदिराजवळ भीषण अपघात झाल्याची घटना उघड झाली आहे. भरधाव कंटेनरने चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.