मुंबईतील GSB सेवा मंडळाने यंदा आपल्या गणेशोत्सवासाठी तब्बल *₹474.46 कोटींचा विमा* उतरवला आहे. यात 67 कोटींचे सोनं-चांदी कव्हर, 375 कोटींचा स्वयंसेवक व पुजाऱ्यांसाठी अपघात विमा आणि 30 कोटींचा सार्वजनिक दायित्व विमा समाविष्ट आहे. 66 किलो सोनं व 336 किलो चांदीने सजलेल्या गणेशमूर्तीच्या वाढलेल्या किमतीमुळे रक्कम वाढल्याचे मंडळाने सांगितले. उत्सव 27 ते 31 ऑगस्टदरम्यान होणार आहे.