गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत पुणे मेट्रो सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत धावणार आहे. या विशेष सोयीमुळे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.