मुंबईतील गिरगाव येथील इस्कॉन मंदिराला धमकी देणारा ईमेल आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इस्कॉन मंदिराच्या अधिकृत ईमेल आयडीवर आलेल्या या ईमेलमध्ये मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मंदिर प्रशासनाने गावदेवी पोलिस ठाण्याला आणि बम निरोधक पथकाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मंदिर परिसराची तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलीस प्रशासन ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.