आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर रहावे, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले. रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.